चाकण | २९ सप्टेंबर २०२६ : पैशांवर ‘सोरट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या २० जणांवर चाकण दक्षिण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत २७ हजार ९६० रुपयांचे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम मिळून आल्याचे पोलिसांनी माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार अनिकेत बाळासाहेब पाटोळे (वय ३९, नेमणूक चाकण दक्षिण पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मौजे नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत, तळेगाव चौक, चाकण येथील आण्णासाहेब मगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एका पत्राशेडमध्ये करण्यात आली.
याप्रकरणी भगवान बबन इंगळे (वय ४१), ज्ञानेश्वर संतू बांगर (वय ४२), संतोष दिनकर ढवळे (वय १९), शंकर नारायण पवार (वय ४२), ओम महादेव नागरगोजे (वय २३), दादा विजय मगर (वय १९), माधव ज्ञानोबा तेलंगे (वय ४४), संजय दिनेश गोसावी (वय ३०), विठ्ठल दामला राठोड (वय ४४), राजेश अर्जुनराव करंजेकर (वय ४०), सतीश नामदेव देवडे (वय ४०), सुभाष खंडू जोगदंड (वय ४५), सखाराम लालू सूर्यवंशी (वय ५६), शैलेंद्र धनराज सोनवणे (वय ३६), परसराम घुले (वय ४९), भागाजी गायके (वय ४६), दादाभाऊ लक्ष्मण गायकवाड (वय ४७), मनसाराम श्रीकृष्ण चव्हाण (वय ३५), जोधन लालधर बिंद (वय ३०) आणि नानासाहेब सखाराम महानवर (वय ३५) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, आरोपी क्रमांक १ ते २० हे पैसे घेऊन ‘सोरट’ नावाचा जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २७ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.