अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त २०० अंध व्यक्तींना स्नेहभोजन व छत्री वाटप!

अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त २०० अंध व्यक्तींना स्नेहभोजन व छत्री वाटप!

निगडी | २६ सप्टेंबर २०२६ : अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त निगडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरात अंध आणि अपंग व्यक्तींसाठी स्नेहभोजन तसेच छत्री वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला सुमारे २०० अंध व्यक्तींनी उपस्थिती लावली. उपस्थितांसाठी मंदिर परिसरात अन्नदानाचाही कार्यक्रम घेण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या पुढाकारातून अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याच्या उद्देशाने अंध आणि अपंग व्यक्तींना स्नेहभोजन देण्यात आले. तसेच त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाच्या आयोजनासाठी क्षत्रिय राजपूत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवकुमार बायस, तसेच प्रविण पायाळ, गौरव रौधाळे, राकेश सिंह, राजू लक्ष्मण काळभोर, उद्योजक बंडूभाऊ लवगे, मुन्ना बेग, फिरोज शेख, सचिन शिंदे, जयदेव भुवड, जगदीश चौधरी, फुआराम चौधरी, रफिक शेख, अविनाश साळवे, बबन दळवी आणि अफसर मुलाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.

सिद्धिविनायक गणेश मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर गरजू अंध आणि अपंग व्यक्तींना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सुमारे २०० अंध व्यक्तींच्या सहभागामुळे हा सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात पार पडला.

वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवता गरजू व्यक्तींसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories