विद्यार्थ्यांनी रेखाटला ‘स्वप्नातला भारत’; पिंपरीत चित्रकला उपक्रम

विद्यार्थ्यांनी रेखाटला ‘स्वप्नातला भारत’; पिंपरीत चित्रकला उपक्रम

पिंपरी | २६ सप्टेंबर २०२६ : विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील विकसित, सक्षम आणि प्रगत भारत कसा असेल, याचे चित्ररूप भारतीय जैन संघटनेच्या शाळेत पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘स्वप्नातला भारत’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या २६ सप्टेंबर रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी संत तुकाराम नगरच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कल्पनेतील भारत चित्रांच्या माध्यमातून साकारला. विद्यार्थ्यांच्या चित्रांमधून विकसित, सक्षम आणि प्रगत भारताची संकल्पना मांडण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी आणि यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना लाडू-चिवडा आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य देशमुख, उपप्राचार्य जाधव, यादव, भाजप कोअर कमिटी सदस्य सदाशिवराव खाडे, माजी नगरसेवक तथा भाजप महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुजाता पालांडे यांच्यासह मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर, अभय फाळके, राहुल खाडे, अमोल घोरपडे, दीपक पाटील, दिनेश पाटील, जयदेव अक्कलकोटे, तात्याराव गायकवाड आणि राहुल शितोळे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना यशवंतभाऊ भोसले यांनी विद्यार्थ्यांना मोठे ध्येय ठेवण्याचे आवाहन केले. “उद्याचा भारत म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात. भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी तुम्हीही मोठे ध्येय ठेवले पाहिजे,” असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

सदाशिवराव खाडे, सुजाता पालांडे आणि प्राचार्य देशमुख यांनी भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या चित्रकला उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories