आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधांच्या नियोजनाला गती

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधांच्या नियोजनाला गती

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधांच्या नियोजनाला गती

वारकऱ्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध संस्थांशी महापालिकेचा समन्वय

पिंपरी, ता. १९ - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी बांधवांना आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींची समन्वय बैठक आयोजित केली. उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या अध्यक्षतेखाली  पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही बैठक पार पडली.

यावेळी वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी केंद्रांचे नियोजन, स्वच्छता व्यवस्थापन, सुलभ शौचालयांची उपलब्धता, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वारकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.

याशिवाय वारी मार्गावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन नियोजन वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीस सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, सुधीर वाघमारे, अतुल सोनवणे, महेश आढाव, राजेश भाट, कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, वैशाली ननावरे यांच्यासह सीवायडीए, बिसलेरी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल गव्हर्नमेंट, संस्कार प्रतिष्ठान, श्री अग्रसेन ट्रस्ट, ईसीए, प्रतिभा कॉलेज, संजीवनी स्वयंसेवी संस्था, अंकुश फाऊंडेशन, ज्ञानगंगा फाऊंडेशन, अल्फा फाऊंडेशन, नंदनवन कुष्ठपीडित संस्था, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, म्हाळसाकांत विद्यालय, सूर्यमुखी हनुमान प्रतिष्ठान, रामकृष्ण मोरे महाविद्यालय, ह्यूमन राईट्स असोसिएशन, संत निरंकारी मंडळ, निर्मल वारी, यशस्वी ग्रुप, आरंभ महिला बचत गट, यशोधरा महिला बचत गट आदी सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि महिला बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वारीदरम्यान वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संस्थांनी महापालिकेला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून, महापालिका व संस्था यांच्या समन्वयातून सेवा अधिक राबविण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories