आषाढी वारी पूर्ण करुन संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा देहू-आळंदीत दाखल

आषाढी वारी पूर्ण करुन संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा देहू-आळंदीत दाखल

आषाढी वारी पूर्ण करुन संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा देहू-आळंदीत दाखल

पिंपरी, ता. १० ऑगस्ट २०२६ - आषाढी वारी पूर्ण करुन संत तुकाराम महाराजांचा पालखी रविवारी (ता. ९) सोहळा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी  (ता. ८) देहू-आळंदीत पोचला आणि आळंदी-देहू परिसरात ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात दुमदुमला. 

संत तुकाराम महाराजांची पालखी श्रीक्षेत्र देहूमध्ये रदुपारी दोनच्या सुमारास परतली. देहू नगरपंचायतीच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती सुधीर काळोखे, कर अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, प्रशासन अधिकारी प्रियांका कदम यांनी तुकोबारायांच्या पालखीला हार अर्पण करून स्वागत केले. 

पालखी महाद्वार कमानीमध्ये तुपे कुटुंबीयांकडून दही भाताचा नैवेद्य दाखवून पालखी रथाचे औक्षण करण्यात आले. पालखीच्या स्वागतासाठी आणि पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. सर्व दिंड्यांच्या विणेकऱ्यांना व सेवेकरी यांना पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे व उमेश महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे व संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते मानाच श्रीफळ प्रसाद देण्यात आला. 

 भक्तांच्या मांदियाळीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीमधील माऊलींच्या समाधी मंदिरात शनिवारी (ता. ८) पोचला. असंख्य भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर रविवारी (ता.  ९) आळंदीत नगरप्रदक्षिणा आणि हजेरी मारुती मंदिर येथे नारळ प्रसादाचा परतीचा कार्यक्रम पार पडला. 











Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories