पिंपरीत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि श्री संत गावरशेठ महाराज पालखी यांच्या भव्य स्वागत सोहळ्यास उत्साहात प्रारंभ
पिंपरीत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि श्री संत गावरशेठ महाराज पालखी यांच्या भव्य स्वागत सोहळ्यास उत्साहात प्रारंभ
सद्गुरु टेडर्सतर्फे महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी, ता. ८ ऑगस्ट २०२६ - पिंपरी शहरात वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेला साजेसा भक्तिमय आणि दिमाखदार सोहळा शनिवारी (ता. ८) अनुभवायला मिळाला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी तसेच श्री संत गावरशेठ महाराज पालखी यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
शगुन चौक ते रिव्हर रोड, पिंपरी या मार्गावर हजारो वारकरी, भाविक आणि नागरिक मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत करत आहेत. टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष, आकर्षक फुलांची सजावट, भव्य स्वागत कमानी, रोषणाई आणि पारंपरिक वारकरी संस्कृतीचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळत आहे.
यावर्षी ४० व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भव्य स्वागत व्यवस्था, शिस्तबद्ध नियोजन आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधा. पालखीचा मुक्काम सतगुरु ट्रेडर्स (मनुभाई), गुरु कृपा बिल्डिंग, जुनी SBI बँकेच्या मागे, रिव्हर रोड, पिंपरी येथे होत असून भाविकांसाठी दर्शन, विश्रांती व सेवा व्यवस्था करण्यात आली आहे.
सायंकाळी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. तसेच रात्री १०.०० वाजल्यापासून याच ठिकाणी हरिकीर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा भक्तिमय सोहळा ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
सद्गुरु ट्रेडर्स, पिंपरी हे या स्वागत सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत. प्रतिवर्षी त्यांच्याकडून पालखी स्वागत सोहळा आयोजित केला जातो. पिंपरी तसेच परिसरातील सर्व नागरिक, वारकरी आणि संतप्रेमींना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन संतांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घेण्याचे आवाहन सद्गुरु ट्रेडर्स प्रमुख मनुभाई यांनी केले आहे. पालखीचा मुक्काम सतगुरु ट्रेडर्स (मनुभाई), गुरु कृपा बिल्डिंग, जुनी SBI बँकेच्या मागे, रिव्हर रोड, पिंपरी येथे होत असून भाविकांसाठी दर्शन, विश्रांती आणि सेवा व्यवस्था करण्यात आली आहे.
