नीट परीक्षेत देशात 498 वा क्रमांक मिळवणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या कन्या अतुल्या डोंगरे यांचा महापौरांकडून गौरव

नीट परीक्षेत देशात 498 वा क्रमांक मिळवणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या कन्या अतुल्या डोंगरे यांचा महापौरांकडून गौरव

नीट परीक्षेत देशात 498 वा क्रमांक मिळवणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या कन्या अतुल्या डोंगरे यांचा महापौरांकडून गौरव

पिंपरी, ता. ३० जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड शहराची कन्या अतुल्या डोंगरे हिने 'NEET- 2026' परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 498 वा क्रमांक (AIR 498) मिळवत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. या देदिप्यमान आणि उल्लेखनीय यशाबद्दल अतुल्याचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते विशेष सत्कार बुधवारी (ता. २९) करण्यात आला. यावेळी महापौरांनी पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन तिचे अभिनंदन केले तसेच तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले की, “स्पर्धेच्या युगात कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे अतुल्या डोंगरे हिने सिद्ध करून दाखवले आहे. तिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबाचे नसून संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या यशातून शहरातील हजारो विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने अधिक जोमाने वाटचाल करतील, असा विश्वास आहे.”

महापौरांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, ''प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कोणतेही ध्येय अशक्य नसते. अतुल्यासारख्या विद्यार्थ्यांचे यश हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे असून, शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी महानगरपालिका नेहमीच कटिबद्ध राहील.''

यावेळी अतुल्याने मनोगत व्यक्त केले. आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याला देत, सातत्याने अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत राहावे, असा संदेशही तिने यावेळी दिला. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी अतुल्याचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories