बाणेरमध्ये कार चालकाला मारहाण; पैसे आणि मोबाईल हिसकावला

बाणेरमध्ये कार चालकाला मारहाण; पैसे आणि मोबाईल हिसकावला

बावधन | ४ ऑक्टोबर २०२६ : मुंबई-बंगळुरू महामार्गावर पिकअप ड्रॉपसाठी थांबलेल्या चालकाला तिघांनी मारहाण करून त्याच्या कारची चावी, खिशातील दोन हजार रुपये आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना सुस पाषाण ब्रिजखाली, सर्व्हिस रोड, बाणेर येथे घडली. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी स्वप्निल सुनील शिंदे (वय २२,  रा. लवळेगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी त्यांची ह्युंदाई कार (क्र. MH 12 JI 0814) रस्त्याच्या कडेला लावून पिकअप ड्रॉपसाठी थांबले होते. त्यावेळी राजवीर, साहिल आणि विशाल (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे तिघे तेथे आले. त्यापैकी साहिलने पाणी पिण्यास मागितल्याने फिर्यादीने कारच्या दरवाजाची काच खाली करून त्याला पाण्याची बाटली दिली.

पाणी पिऊन झाल्यानंतर साहिलने दरवाजाच्या काचेतून हात घालून दरवाजा उघडला आणि कारची चावी काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर राजवीर, साहिल आणि विशाल हे कारमध्ये बसले. आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली, तर साहिलने कारच्या चावीने तोंडावर मारून जखमी केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

तसेच, “तू दुसऱ्या कोणाला फोन केला तर तुला खंजीर खुपसून मारीन,” अशी धमकी देत विशालने फिर्यादीच्या पाकिटातील २ हजार रुपये आणि टेक्नो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरसे करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories