कामगाराच्या मृत्यूप्रकरणी मालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी मालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

खालुंब्रे | १६ सप्टेंबर २०२६ : कंपनीत काम करत असताना एका ३५ वर्षीय कामगाराचा गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकासह पाच जणांविरोधात उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास मौजे खालुंब्रे, खालुंब्रेगाव हद्दीतील व्हिजन टेक कंपनी, एचपी चौक, ता. खेड, जि. पुणे येथे घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन रंगनाथ महाडिक (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात कंपनीचे मालक अजय खंडेलवाल, प्लांट हेड अनिल पोपटाल धारूरकर, कॉन्ट्रॅक्टर अनुप रघुनाथ सूर्यवंशी, एचआर राजेंद्र मोरे आणि पेंट शॉप इन्चार्ज विश्वास शांतिलाल ससाणे  यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, मनोजकुमार रामप्रसाद साकेत (वय ३५, मूळ रा. मध्य प्रदेश) हे कंपनीत काम करत असताना त्यांची प्रकृती गंभीर बिघडली. त्यांना प्रथम इंद्रायणी हॉस्पिटल, खालुंब्रे येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी १७ सप्टेंबर रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी येथे नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत पोलिसांना माहिती देणे आवश्यक असतानाही कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुल्ला करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories