news
clock
लोखंडी रॉडने मारहाण, तरुण गंभीर जखमी

लोखंडी रॉडने मारहाण, तरुण गंभीर जखमी

 लोखंडी रॉडने मारहाण, तरुण गंभीर जखमी

पिंपरी, ता. १५ - पिंपरी परिसरातील भाटनगर, गिरिजा बाबा मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या हाणामारीत एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. लाकडी दांडके व लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज महेश कजानिया (वय २४, रा. निराधार नगर, पिंपरी) यांच्या मित्रांवर आरोपींकडून वारंवार खुन्नस दिली जात होती. याबाबत समजावण्यासाठी फिर्यादी व त्यांचे मित्र विश्वास अशोक शिंदे (वय २८) हे आरोपींच्या घराजवळ गेले असता वाद वाढून हल्ला करण्यात आला.

या वेळी आरोपींनी लाकडी दांडके व लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच एका आरोपीने धमकी देत “आमच्या नादी कोणी लागल्यास खल्लास करू” असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमींपैकी एक तरुण गंभीर जखमी होऊन निपचित पडला.

या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींपैकी एकास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पिंपरी पोलिस करत आहेत.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories