भोसरी | ४ ऑक्टोबर २०२६ : जुन्या भांडणाच्या कारणावरून २० वर्षीय तरुणाला बोलण्यासाठी घेऊन जात त्याच्या नाकावर आणि डाव्या गालावर काटा चमच्याने वार करून जखमी केल्याची घटना भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एस.के. १ बार, इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. या प्रकरणी साहिल समशेर शेख (वय २०, व्यवसाय-रिक्षाचालक, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात बाबासाहेब काळूराम जाधव (वय ३०, रा.बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून बोलण्यासाठी फिर्यादीला एस.के. १ बार येथे नेले. दोघे दारू पित बसले असताना आरोपीने हॉटेलमधील काटा चमच्याने फिर्यादीच्या नाकावर आणि डाव्या गालावर वार करून त्यांना जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दशवंत करीत आहेत.