news
clock
प्रभाग क्र. ५ मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्त्याच्या कामाची महापौरांकडून पाहणी

प्रभाग क्र. ५ मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्त्याच्या कामाची महापौरांकडून पाहणी

प्रभाग क्र. ५ मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्त्याच्या कामाची महापौरांकडून पाहणी

काम गुणवत्तापूर्ण, वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

पिंपरी, ता. २१ - ''भोसरी परिसरातील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क या मार्गावरील रस्त्याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे हे काम गुणवत्तापूर्ण, वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या कालावधीत वाहतुकीस कमीत कमी अडथळा निर्माण होईल यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनाने समन्वयाने काम करावे. अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व विभागांनी जबाबदारीने आपली कामे पार पाडावीत.'', असे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी दिले.

महापौर लांडगे यांनी शनिवारी (ता. २१) भोसरी येथील प्रभाग क्र. ५ मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क येथील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित विभागांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देत कामाचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दरम्यान  नगरसदस्य भिमाबाई फुगे, प्रा. सोनाली गव्हाणे, सागर गवळी, जालिंदर शिंदे, विराज लांडे, ह क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील तसेच पाणीपुरवठा, स्थापत्य, शहरी दळणवळण, ड्रेनेज, जलनिस्सारण, नगररचना आदी विभागांचे कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान महापौर यांनी पोलीस प्रशासनास रहदारी कमी करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे. स्थापत्य विभागाने रस्त्याचे काम विहित वेळेत पूर्ण करताना कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये. शहरी दळणवळण विभागास वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. रस्त्याच्या कामासोबतच संबंधित पायाभूत सुविधा सुरळीत ठेवाव्यात. भविष्यात रस्ता पुन्हा उकरावा लागू नये यासाठी सर्व कामे समन्वयाने पूर्ण करावीत, अशा सूचना महापौरांनी दिल्या. महापौरांनी प्रभागातील नगरसदस्यांशी यांच्याशीही संवाद साधत स्थानिक समस्या व नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे 

भोसरी परिसरातील प्रभाग क्र. ५ मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. याबाबत स्थानिक नागरिक तसेच नगरसदस्यांकडून हा रस्ता तात्पुरता बंद ठेवावा आणि पर्यायी स्वरूपात एकेरी वाहतूक सुरू ठेवावी, अशी सातत्याने मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत श्रीराम नवमीपर्यंत सदर रस्ता पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. श्रीराम नवमीनंतर कामाच्या प्रगतीनुसार हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात येईल. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग पुन्हा दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. ही उपाययोजना तात्पुरती असली तरी ती नागरिकांच्या सोयी, सुरक्षितता आणि वाहतुकीच्या शिस्तीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा.

– रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories