बौध्दनगर-पिंपरीतून लोखंडी तलवार बाळगणाऱ्या युवकाला अटक
पिंपरी, ता. २७ - तडीपार आदेश व शस्त्रबंदी आदेशाचा भंग करुन लोखंडी तलवार बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी बौध्दनगर, पिंपरी येथून रविवारी (ता. २६) अटक केली आहे.
पोलीस शिपाई समीर लक्ष्मण ढवळे यांनी फिर्याद नोंदवली आहे. आरोपी अविनाश प्रकाश माने (वय. २६ वर्ष, रा. बौध्दनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपीला तडीपार केले होते. मात्र, त्याने तडीपार आदेशाचा भंग केला व तो तलवार घेऊन उभा असलेला पिंपरी येथे सापडला. तसेच त्याने घातक शस्त्र जवळ बाळगण्यास बंदी आदेशाचाही भंग केला आहे.
आरोपीवर रविवारी (ता. २६) पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) सह १३५, १४२ प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे.