सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल!

सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल!

चाकण | ३० सप्टेंबर २०२६ : सार्वजनिक ठिकाणी आपापसात झोंबाझोंबी करत मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात उत्तर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष दत्तात्रय डमाळ (वय ३७, पोलीस शिपाई, नेमणूक उत्तर चाकण पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी नागनाथ गोविंद चवकुंटले (वय २१ रा. चाकण ) रमेश व्यंकट वाघमोडे (वय १८ रा. चाकण) ओमकार बापूराव चाकटवाड (वय १९ रा. चाकण) रमाकांत गोविंद सलगरे (वय २४ रा. चाकण) मोहित चंद्रकांत कोळेकर (वय २३, रा. करंजविहिरे, कोळेकर वस्ती, ता. खेड) आणि निखिल भगवान सातव (वय २० रा. चाकण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी क्रमांक पाचला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

ही घटना २८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास डीसी पेट्रोल पंप, गुडलक हॉटेलशेजारी, आंबेठाण रोड, चाकण येथे घडली.

फिर्यादीत म्हटले आहे की, सहाही जण सार्वजनिक ठिकाणी आपापसात झोंबाझोंबी करत होते. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना ते पोलिसांना मिळून आले.

याप्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories