घरासमोरून दुचाकीची चोरी!

घरासमोरून दुचाकीची चोरी!

वाकड | ३० सप्टेंबर २०२६ : घरासमोर पार्क करून लॉक केलेली २० हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशुतोष  चंद्रकांत शेटे (वय ३०,वाल्हेकरवाडी, चिंचवड; मूळ रा. चिंचणीआंबा, ता. कडेगाव, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची एच.एफ. डिलक्स दुचाकी (क्र. एमएच १० बीएल ६६७९) त्यांनी वाकड येथील  राहत्या घरासमोर पार्क करून लॉक केली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही दुचाकी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ही चोरी २४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० वाजल्यापासून झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories