चाकण | २ ऑक्टोबर २०२६ : चाकण परिसरात बेकायदेशीररीत्या विक्री करण्यासाठी गांजा बाळगणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला चाकण उत्तर पोलिसांनी पकडले. आरोपीच्या ताब्यातून २८६ ग्रॅम वजनाचा १५ हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी दत्तात्रय लोखंडे, पोलीस शिपाई चाकण उत्तर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई २ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास चाकण गावाच्या हद्दीत, चाकण ते शिक्रापूर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कृष्ण लीला हॉटेलसमोरील कृष्ण लीला पान टपरीमध्ये करण्यात आली.
याप्रकरणी विकास ब्रिजकिशोर कुमार (वय २६, रा. कडाची वाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे; मूळ उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी विकास कुमार याच्या ताब्यात २८६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्याची किंमत १५ हजार रुपये असून आरोपी हा गांजा अनधिकृतपणे आणि बेकायदेशीररीत्या विक्री करण्यासाठी ताब्यात बाळगताना मिळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनभुले करत आहेत.