सक्षम जाधवची तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

सक्षम जाधवची तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

पिंपरी | ३ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित शालेय तलवारबाजी स्पर्धेत रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधव याने १४ वर्षांखालील वयोगटात उल्लेखनीय कामगिरी केली. सहाही फेऱ्यांमध्ये विजय मिळवत त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले.

इयत्ता सहावीत शिकणाऱ्या सक्षमने स्पर्धेतील एकूण सहा फेऱ्यांमध्ये प्रत्येकी पाच गुणांचे लक्ष्य साध्य केले आणि सर्व फेऱ्या जिंकल्या. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका प्रिया सूर्यवंशी या त्याच्या मार्गदर्शिका आहेत.

सक्षम इयत्ता तिसरीपासून बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये तलवारबाजीचा सराव करत आहे. छत्रपती पुरस्कारप्राप्त श्वेता चंडालिया यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रशिक्षण घेत आहे.

कासारवाडी प्राथमिक शाळेत झालेल्या या स्पर्धेत २४ शाळांनी सहभाग नोंदविला. विविध गट आणि प्रकारांमध्ये सुमारे ५६ वैयक्तिक खेळाडू आणि १८ संघ सहभागी झाले होते.

शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारांत नैपुण्य मिळविण्यासाठी शाळेत विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे प्राचार्य डॉ. बिंदु सैनी यांनी सांगितले.

सक्षमच्या कामगिरीबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सक्षम जाधवसह क्रीडा शिक्षिका प्रिया सूर्यवंशी आणि मुख्याध्यापिका पद्मावती बंडा यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories