news
clock
उन्हाळी सुट्टीनिमित्त लहान मुलांसाठी भरणार 'बाल पुस्तक जत्रा', ३० एप्रिल ते ४ मेपर्यंत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन

उन्हाळी सुट्टीनिमित्त लहान मुलांसाठी भरणार 'बाल पुस्तक जत्रा', ३० एप्रिल ते ४ मेपर्यंत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन

उन्हाळी सुट्टीनिमित्त लहान मुलांसाठी भरणार 'बाल पुस्तक जत्रा', ३० एप्रिल ते ४ मेपर्यंत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन

पुणे, ता. २१ - अलीकडे सगळीकडेच लहान मुलेही मोबाईल पाहण्यात गुंतलेली पाहायला मिळतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांच्या हातातील मोबाईल बाजूला सारुन त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी पुण्यात आयोजित केली जातेय....'पुणे बालपुस्तक जत्रा'. ही जत्रा राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, 'संवाद, पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्यातर्फे ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे घेण्यात येत आहे.

पुणे बालपुस्तक जत्रेची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सोमवारी (ता. २०) पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी 'संवाद'चे प्रमुख सुनील महाजन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसाद मिरासदार उपस्थित होते. 

पांडे म्हणाले, " यंदा बाल पुस्तक जत्रेमध्ये बालसाहित्याची शंभर दालने असणार आहेत.  सर्व स्टॉलचे आरक्षण झाले आहे. पुस्तकांच्या दालनांसह जत्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामीण व साहसी खेळ, खाद्यजत्रा यांची रेलचेल असेल. यामध्ये 'मुलांचे गीतरामायण', किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बालसाहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कविसंमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, 'लेखक तुमच्या भेटीला', 'चिंटू तुमच्या भेटीला', नाट्यनगरी कार्यशाळा, जादूचे खेळ, प्रशिक्षण असे नावीन्यपूर्ण कार्यक्रम लहान मुलांना अनुभवायला मिळतील.  विद्यार्थी आणि पालकांना या जत्रेत विनामूल्य प्रवेश आहे. गतवर्षी या जत्रेत बालसाहित्याची ७५ दालने होती आणि सुमारे ५५ ते ६० हजार मुले सहभागी झाली होती. '' शालेय विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळवण्यासाठी आवर्जून या बाल पुस्तक जत्रेला भेट दिली पाहिजे.  






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories