रस्त्याच्या कडेला पार्क केलेली बजाज रिक्षा चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

रस्त्याच्या कडेला पार्क केलेली बजाज रिक्षा चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

चिंचवड | ५ ऑक्टोबर २०२६ : रस्त्याच्या कडेला पार्क केलेली ६० हजार रुपये किमतीची काळ्या-पिवळ्या रंगाची बजाज कंपनीची रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना चिंचवड परिसरात घडली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० ते ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान सुदर्शन नगर पॉवर हाऊसजवळ रस्त्याच्या कडेला घडली. अभिजीत नामदेव शेलार (वय २१,  आनंदनगर, चिंचवड स्टेशन, चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीने त्यांच्या ताब्यातील ६० हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची रिक्षा (क्र. MH 14 JC 8798), काळ्या-पिवळ्या रंगाची, सुदर्शन नगर पॉवर हाऊसजवळ रस्त्याच्या कडेला पार्क केली होती.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही रिक्षा चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories