पोलीस ठाण्यात गोंधळ घालत काच फोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यात गोंधळ घालत काच फोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

महाळुंगे | ५ ऑक्टोबर २०२६ : मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालताना आढळलेल्या व्यक्तीला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याने कर्तव्यावरील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या कामात अडथळा निर्माण करत पोलीस ठाण्यातील काच फोडल्याची घटना दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष रामजाधव यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात भारत राठोड (वय ३२, रा. फलके वस्ती, मोई, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. पोलिस ठाण्यात आल्यानंतर आरोपीने तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

तसेच आरोपीने पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षासमोरील काचेवर डोके आपटून काच फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories