पार्किंगच्या वादातून चिंचवडमध्ये तरुणाला मारहाण!

पार्किंगच्या वादातून चिंचवडमध्ये तरुणाला मारहाण!

चिंचवड | १ ऑक्टोबर २०२६ : सोसायटीसमोरील रस्त्यावर गाडी पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून २६ वर्षीय तरुणाच्या डोक्यात विटेने मारून जखमी केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली. तसेच रूम खाली करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष राजेंद्र बाविस्कर (वय २६, रा. मुक्ताईनगर, जळगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अशोक पिसाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शुभारंभ कॉलनी, गुरुद्वारा चौक, चिंचवड येथील इमारतीसमोरील रोडलगत घडली.

फिर्यादीनुसार, मनीष हे त्यांचा मित्र तन्मय चौधरी याच्यासोबत तो राहत असलेल्या सोसायटीच्या इमारतीसमोरील रस्त्यालगत गाडी पार्क करत होते. त्यावेळी तेथील पल्सर गाडीचा मालक असलेल्या आरोपी अशोक पिसाळ याने फिर्यादीशी पार्किंगच्या कारणावरून वाद घातला.

वादादरम्यान तेथे पडलेल्या विटेने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या वर डोक्यात मारून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच फिर्यादीला रूम खाली करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories