फुगेवाडी ब्रिजखाली तरुणाला मारहाण; दापोडीत चौघांविरोधात गुन्हा

फुगेवाडी ब्रिजखाली तरुणाला मारहाण; दापोडीत चौघांविरोधात गुन्हा

दापोडी | १ ऑक्टोबर २०२६ : मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या ३० वर्षीय तरुणासोबत जागेवरून वाद घालत चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दापोडीतील फुगेवाडी ब्रिजखाली घडली. मारहाणीत एका आरोपीने कुठल्यातरी हत्याराने तरुणाच्या डोक्यात वार केल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश बापू अय्याळी (वय ३०, रा. फुगेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी मुकेश चंदन परदेशी, चंदन घनश्याम परदेशी आणि दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी ब्रिजखाली फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी मुकेश परदेशी तेथे आला. त्याने फिर्यादीला “ही जागा तुझ्या बापाची आहे का? तू येथे का बसला आहेस?” असे म्हणत चिडून जाऊन मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर आरोपीने कुठल्यातरी हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. डोक्यातून रक्त येऊ लागल्याने फिर्यादीला वायसीएम रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.

त्यानंतर फिर्यादी दापोडी पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आले असताना झालेल्या भांडणामध्ये चारही आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मुकेश परदेशी याने कुठल्यातरी हत्याराने डोक्यात, पाठीवर आणि हातावर मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories