चिंचवडमध्ये सर्व्हिस सेंटरमधून ई-बाईकचे साहित्य चोरी; दोघांवर गुन्हा

चिंचवडमध्ये सर्व्हिस सेंटरमधून ई-बाईकचे साहित्य चोरी; दोघांवर गुन्हा

चिंचवड | 2 ऑक्टोबर 2026 : मोहननगर येथील जय मातादी सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या विधी संघर्षित बालकाने सर्व्हिस सेंटरमधून 9 लाख 86 हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर चोरून भंगारविक्रेत्याला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात विधी संघर्षित बालकासह भंगारविक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका ४६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 

ही घटना डिसेंबर २०२५ ते १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत, मोहननगर, चिंचवड येथील जय मातादी सर्व्हिस सेंटरमध्ये घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, सर्व्हिस सेंटरमध्ये ट्रेनी म्हणून काम करणाऱ्या विधी संघर्षित बालकाने एकूण १ लाख ८६ हजार रुपये किमतीच्या ई-बाईकच्या बॅटऱ्या आणि ई-मोटरची चोरी केली. त्यानंतर चोरी केलेले साहित्य भंगारवाला इसम (वय अंदाजे ४० वर्षे, रा. भंगार दुकान, चिखली , पुणे; पूर्ण नाव-पत्ता माहिती नाही) याला विकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणातील भंगारविक्रेत्याला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे नोंदीत नमूद आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०६ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतिग्रे करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories