मोशी | २ ऑक्टोबर २०२६ : पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत १८ वर्षीय तरुणाच्या पँटच्या खिशातून १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरल्याची घटना मोशी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थव नवनाथ कोतवाल (वय १८,रा. ढोरे भांबुरवाडी, पो. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मोशी चौकातील PMPML बस स्टॉपवर घडली.
फिर्यादीनुसार, अर्थव कोतवाल हे मोशी येथील पीएमपीएमएल बस स्टॉपवरून बसमध्ये चढत होते. त्यावेळी निळसर रंगाची पँट आणि आकाशी रंगाचा टी-शर्ट घातलेल्या अनोळखी व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पँटच्या खिशातील १२ हजार रुपये किमतीचा हिरव्या रंगाचा Vivo कंपनीचा Y31 मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खोसे करत आहेत.