ट्रेलर मागे घेताना दुचाकीला धडक; ४७ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

ट्रेलर मागे घेताना दुचाकीला धडक; ४७ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

तळेगाव एमआयडीसी | २ ऑक्टोबर २०२६ : भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने कोणताही इंडिकेटर न देता ट्रेलर मागे घेताना दुचाकीला धडक दिल्याने ४७ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना मिंडेवाडी परिसरात घडली. अपघातानंतर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता ट्रेलर चालक वाहन घटनास्थळी सोडून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश जगन्नाथ देशमुख (वय ४२, व्यवसाय शेती, रा. देशमुखवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रवीण ज्ञानदेव सांगळे (वय २४, रा. म्हात्रेवस्ती, त्रिवेणीनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास एच.पी. पेट्रोल पंपाजवळ, मिंडेवाडी येथे घडली.

फिर्यादीचा भाऊ सचिन जगन्नाथ देशमुख (वय ४७) हा त्याची मोटारसायकल क्रमांक MH 14 CA 3454 वरून मिंडेवाडी येथील राहत्या घराकडे जात होता. त्याचवेळी आरोपी प्रवीण सांगळे हा ट्रेलर क्रमांक NL 01 N 4705 घेऊन त्याच मार्गाने जात होता.

फिर्यादीनुसार, ट्रेलर चालकाने कोणत्याही प्रकारचा इंडिकेटर न लावता, वाहतुकीच्या नियमांकडे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चुकीच्या पद्धतीने पाठीमागे घेतले. त्यामुळे दुचाकीला धडक बसून सचिन देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांच्या मोटारसायकलचेही नुकसान झाले.

अपघातानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता तसेच जखमीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता ट्रेलर तेथेच सोडून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात BNS कलम १२५(अ)(ब), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दंगट करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories