शहरात कॉंग्रेस सर्व नागरिकांना सोबत घेऊन काम करेल, कॉंग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांची भूमिका
शहरात कॉंग्रेस सर्व नागरिकांना सोबत घेऊन काम करेल, कॉंग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांची भूमिका
पिंपरी, ता. ८ - ''आगामी काळात कॉंग्रेस पिंपरी-चिंचवडमध्ये संघटन, प्रशिक्षण, प्रबोधन, आंदोलन आणि परिवर्तन या पंचसूत्रीनुसार काम करेल. सर्व नागरिकांना सोबत घेत काँग्रेस सर्वांचा पक्ष आम्ही करुन दाखवणार आहोत.'', अशी भूमिका कॉंग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी विशद केली.
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचा पदग्रहण सोहळा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे आणि मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच पार पडला. प्रारंभी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अनंतरावजी थोपटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते काँग्रेसचा ध्वज नवनिर्वाचित शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आला आणि तो स्वीकारात त्यांनी त्यांचा पदभार स्वीकारला. कॉंग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच काँग्रेस पक्षाचा पिंपरी-चिंचवड शहराचा लोगो, एस आय आर मतदार यादी पुनर्परीक्षण अभियानाच्या माहिती मदत क्रमांकाचे उद्घाटन, पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या वेबसाईटचे उद्घाटन सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील २० कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यामध्ये प्रामुख्याने मुंबई येथील निवृत्त न्यायाधीश बाळासाहेब पाटील, सदाशिव तळेकर, वंचितच्या शिल्पा गायकवाड, प्रवीण कांबळे, जावेद इनामदार, महेंद्र सरोदे, अतुल शिंगाडे, मनोज गिल, बाबा बनसोडे, कमलेश जैन, गोरख खळगे यांचा समावेश होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालेल्या वाकड प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार स्वप्निल बनसोडे यांनी आणि वंचित मधून मोठी मते घेत निगडी मधून निवडणूक लढलेल्या शिल्पा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
नरेंद्र बनसोडे म्हणाले, ''पिंपरी-चिंचवड शहराची जडणघडण काँग्रेसकडूनच झाली, मात्र सन १९९९ नंतर वरिष्ठ नेते शहरात येत नाहीत पवारांशी थेट सामना केला जात नाही, या भावनेने कार्यकर्ते खचत गेले आणि काँग्रेस पक्ष काही प्रमाणात कमकुवत झाला. मात्र आता परिस्थिती बदलल्याने येत्या काळात सर्व वंचित उपेक्षित आणि सर्वसाधारण नागरिकांना सर्वांना सोबत घेत सर्वांची काँग्रेस करून दाखवण्याचा आमचा मानस आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचार आवाज उठवणार आहोत. मतदार यादी पुनर्परीक्षण अभियानावर अधिक भार देत जून ते ऑक्टोबर मोठे अभियान राबवले जाणार आहे. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता मैदानात लढण्यासाठी सज्ज होणार आहे. ''
आमदार सतेज पाटील म्हणाले, '''पूर्वीच्या काळात स्वर्गीय रामकृष्ण मोरे स्वर्गीय अनंतराव थोपटे आणि राज्यातील इतरही नेत्यांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा पाया मजबूत केला. मात्र पुढील काळात आघाडीमुळे दुर्दैवाने एकमेकांच्या ठिकाणी लक्ष न देण्याचे ठरले त्यामुळे पक्ष कमी झाला. दहा-वीस वर्षांपूर्वीचा काँग्रेस पक्ष पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा, परिवर्तन होऊ शकते कारण मतदार तोच आणि निवडणुका मात्र वेगवेगळ्या आहेत. विरोधक विकास डोळ्यापुढे न ठेवता नागरीकांची दिशाभूल करत निवडणूक लढवत आहेत. मात्र, काँग्रेसचे कार्यकर्ते हे अडचमीत नागरिकांच्यासोबत उभे हा विश्वास देत पुढे जाणे गरजेचे आहे. ''
संजय आवटे म्हणाले, ''आता काँग्रेसने सामान्य नागरीकांना सोबत घेत काम करणे महत्त्वाचे आहे. येत्या काळात पिंपरी-चिंचवड शहर हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कारण पुणे शहर पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए चा भाग मिळवून सुमारे सव्वा कोटी मतदार या ठिकाणी आहेत सर्व जात धर्माचे लोक या ठिकाणी राहतात म्हणून येत्या काळात तरुण नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे. नव्या पिढीला नवे राजकारण संविधान मूल्यावर उभा देश हवा आहे.''
याप्रसंगी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, हाजी जाकीर शेख, दाहर मुजावर, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, माजी महापौर कवीचं भाट, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दही तुले, माजी नगरसेवक अत्तर भाई चौधरी, काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. जितेंद्र जैन, प्रा. बी बी शिंदे, गौतम आरकडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उमेश खंदारे, स्वप्निल बनसोडे, महादेव वाळुंजकर, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे, प्रवीण कदम, वैभव जाधव, छावा संघटनेचे रावसाहेब गंगाधरे आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभासाठी हिराचंद जाधव, महेश नांद्रे, जितेंद्र छाबडा, विजय ओव्हाळ, हरीश डोळस, कुणाल भोसले, बाबा गैसमुद्रे, उमेश बनसोडे, सदाशिव तळेकर यांनी संयोजन केले.