वृक्षाथॉन मॅरेथॉन स्पर्धेसाठी उद्या सांगवी, वाकड परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल
पिंपरी, ता. ६ - पुणे पोलिस आयुक्तालय व फिटनेस फस्ट इंडिया यांच्यातर्फे रविवारी, ७ जूनला वृक्षाथॉन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड परिसरातूनही जाणार असल्याने सांगवी, वाकड, भोसरी वाहतूक विभागांतर्गत वाहतूकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी जारी केले आहेत.
आदेशानुसार, मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावर उद्या, रविवारी (ता. ७) सकाळी ५:०० ते १०:०० यावेळेत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांच्या वाहतूकीस आवश्यकतेनुसार मनाई करण्यात आली आहे. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
सांगवी, वाकड, भोसरी वाहतूक विभागांतर्गत केलेले वाहूकीतील तात्पुरते बदल -
१) कस्पटे चौक तसेच जगताप डेअरी चौक येथून राजीव गांधी ब्रिज मार्गे पुणे शहर हद्दीत जाण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग:- सदर मार्गावरील वाहने जगताप डेअरी शिवार चौक कोकणे चौक पी. के चौक भोसरी
ओव्हरब्रिज मार्गे इच्छितस्थळी जातील.
२) पिंपळे निलख बाजूकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना रक्षक चौक येथून उजवे बाजूस वळून राजीव गांधी ब्रिज मार्गे पुणे शहर हद्दीत जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- रक्षक चौक येथून डावे बाजूस जगताप डेअरी चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
३) सांगवी पोलीस चौकी, पाण्याचे टाकीकडून येणारे सर्व प्रकारचे जड अवजड वाहतुकीस सांगवी फाटा येथून डावे बाजुस वळून राजीव गांधी ब्रिज मार्गे पुणे शहर हद्दीत जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सांगवी पोलीस चौकी मार्गे इच्छितस्थळी जातील.