शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या -

शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या -

शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - 

🟥 ताथवडेमध्ये गावठी पिस्तुलासह युवकाला अटक

पिंपरी, ता. १ : ताथवडे परिसरात गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनोज कुमार जोखईराम पाल (वय २६, रा. लोंढे वस्ती, ताथवडे, मूळ रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास औंध-रावेत बीआरटी मार्गावरील डांगे चौक उड्डाणपुलाच्या उताराजवळील फुटपाथ परिसरात आरोपी संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी कारवाई केली असता, आरोपीच्या ताब्यात कोणताही वैध परवाना नसलेले एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले.

यावेळी पिस्तुलावर उत्पादकाचे नाव, अनुक्रमांक अथवा अन्य ओळखचिन्ह नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले. तसेच पोलिस आयुक्तालयाने लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने शस्त्र बाळगल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोलिस हवालदार वंदू दत्तात्रय गिरे यांनी फिर्याद दिली असून वाकड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ मधील कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------

🟥 बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जिवंत काडतूसासह देशी पिस्तूल बाळगणारा युवक अटकेत 

पिंपरी, ता. 1- बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनाई आदेशाचे उल्लंघन करून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी एका २२ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दिनांक ३० जून २०२६ रोजी रात्री सुमारे ७ वाजता सुस (ता. मुळशी) येथील सनिज वर्ल्ड समोरील रस्त्यावर करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश दयानंद गायकवाड (वय २२, रा. सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लागू केलेल्या मनाई आदेशादरम्यान शस्त्र, लाठी, बंदुका किंवा इजा करणारी कोणतीही वस्तू बाळगण्यास प्रतिबंध असतानाही आरोपीने आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे.

-------------------------------------------------

🟥 मौजे निघोजे येथे युवकाकडून जिवंत काडतुसासह देशी बनावटीचे पिस्तूल जप्त 

पिंपरी, ता. १ - दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका २३ वर्षीय युवकाकडून देशी बनावटीची पिस्तूल (गावठी कट्टा) आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. बेकायदेशीररित्या , विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलिस शिपाई प्रशांत जयंत कसबे यांनी फिर्याद नोंदवली. ही कारवाई ३० जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता मौजे निघोजे (ता. खेड) परिसरातील महिंद्रा सर्कलजवळ करण्यात आली. शेखर पोपट तांबे (वय २३, रा. तांबेवाडी, वरुडे, ता. खेड, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे  २५,५०० रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत पितळी काडतूस आढळून आले. आरोपीने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने   निर्गमित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले. 

आरोपीविरुद्ध दक्षिण म्हाळुंगे पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३ (२५), सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चेकलम ३७ (१) / १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------

 🟥 उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारू जप्त; एकाला अटक

 पिंपरी, ता. १ - उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा बाळगणाऱ्या एका युवकास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई दिनांक २९ जून २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता भांबोली (ता. खेड) गावच्या हद्दीत, “दोस्ती चायनीज हॉटेल”च्या उजव्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली.

याप्रकरणी पोलिस शिपाई क्र. २८१६ रामहरी महादेव शिंदे (वय ३५, नेमणूक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वजीत बिपीन कुमार महीलांगे (वय १९, रा. भांबोली, ता. खेड) याच्याकडे विनापरवाना देशी दारूचा साठा आढळून आला. यामध्ये त्याच्याकडे देशी दारुच्या  १८० मिली'च्या ५१ बाटल्या आणि ९० मिली'च्या ३७ बाटल्या असा एकूण ५,५६० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीवर उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------

 🟥  उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टीची दारू जप्त; एकास अटक

पिंपरी, ता. १ - उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू बाळगून विक्री करणाऱ्या एका इसमास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई दिनांक ३० जून २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता खेड तालुक्यातील गोनवडी गावच्या हद्दीत, नदीकाठी मोकळ्या जागेत करण्यात आली.

या प्रकरणी पोलिस बं. नं. २०३६ मंगेश देवराम कदम (नेमणूक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली असून गुन्हा त्याच दिवशी सायंकाळी ६.३७ वाजता दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जीवन मारुती राजपूत (वय ४८, रा. गोनवडी, ता. खेड) हि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारूची अवैध विक्री करत होता.  कारवाई दरम्यान १७००/- रुपयांची १७ लिटर गावठी हातभट्टी दारू  जप्त करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

आरोपीवर उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories