दापोडीत लहान मुलांच्या भांडणातून तरुणाला मारहाण; सहा जणांवर गुन्हा

दापोडीत लहान मुलांच्या भांडणातून तरुणाला मारहाण; सहा जणांवर गुन्हा

दापोडी | ५ ऑक्टोबर २०२६ : लहान मुलांच्या भांडणात का पडला, या कारणावरून ३२ वर्षीय तरुणाला सहा जणांनी शिवीगाळ करत हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दापोडी येथे घडली. यावेळी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेल्या एका अनोळखी मुलाने फिर्यादीच्या  कानावर दगड मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास पुणे महापालिकेच्या कचरा विलगीकरण प्लांटजवळ, दापोडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला घडली. मनिष उर्फ मनोज मारुती कांबळे (वय ३२, रा. उर्दू शाळेजवळ, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात अनिकेत संजय भोसले, अजित उर्फ संजय बाबू सोनकांबळे, रहिमान, दोन महिला आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक अनोळखी मुलगा अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी “तुम्ही लहान मुलांचे भांडणात का पडला?” असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीदरम्यान पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेल्या अनोळखी मुलाने फिर्यादीच्या  कानावर दगड मारून त्यांना जखमी केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories