news
clock
नगरसेविका सविता आसवानी यांचे पती धनराज आसवानी यांना मारहाण

नगरसेविका सविता आसवानी यांचे पती धनराज आसवानी यांना मारहाण

 नगरसेविका सविता आसवानी यांचे पती धनराज आसवानी यांना मारहाण 

पिंपरी, ता. २१ - पिंपरीतील शगुन चौकात अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नगरसेविका सविता आसवानी यांचे पती धनराज आसवानी यांना एका दुकानाचे मालक व त्याच्या साथीदारांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना रविवारी (दि. १९) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फय्याज शेख ऊर्फ रिंकू, आरीफ शेख, मुल्लाजी, अरबाज, शोहेब, उमर, इरफान व इतर संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता अतिक्रमणविरोधी पथकाची शगुन चौकात कारवाई सुरु होती. धनराज आसवानी हे घटनास्थळी पोहोचले आणि दुकान मालक फय्याज शेख याने आसवानी यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी त्यांना मारहाण केली. 

या घटनेची माहिती समजताच व्यापाऱ्यांनी पिंपरी कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेतली. सुरवातीला पोलिसांनी तक्रार न घेतल्याने रात्री साडेनऊ ते साडेदहापर्यंत व्यापाऱ्यांनी शगुन चौकात रस्ता रोको आंदोलन केले. मध्यरात्री २ वाजता  तक्रार दाखल झाली.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories