कौटुंबिक वादातून पुतण्याची काका-काकीला मारहाण, पुतण्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २२ - कौटुंबिक वादातून २४ वर्षीय पुतण्याने आपल्या काका-काकीला शिवीगाळ करुन मारहाण केली आणि सिमेंटचा गट्टू काकाच्या डोक्यात मारुन काकाला जखमी केले. ही घटना सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पवनानगर येथे घडली.
याबाबत, शंकर शिवराम नखाते (वय ५२ वर्ष, रा. रहाटणी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी पुतण्या तेजस संतोष नखाते (वय २४ वर्षे , रा. पवारनगर) सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी फिर्यादी शंकर नखाते यांची आई नामे यमुनाबाई शिवराम नखाते या त्यांच्या जुन्या घरी त्यांचे अधारकार्ड व पॅनकार्ड मागण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शंकर नखाते यांचा पुतण्या तेजस नखाते याने आजीला म्हणजे फिर्यादीच्या आईला कागदपत्रे देणार नाही म्हणून शिवगाळ करुन ढकलून दिले. त्यामुळे फिर्यादी शंकर नखाते पत्नीसह त्याला विचारणा करण्यासाठी गेले असता तेजसने काका-काकीला शिवीगाळ करुन हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. कालाला ढकलून दिले व बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू काकाच्या डोक्यात मारुन जखमी केले.
आरोपी पुतण्यावर सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२ प्रमाणे, भारतीय दंड विधान कलम ३२४,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.