news
clock
कारला दुचाकी धडकल्याच्या कारणारुन झालेल्या मारहाणीत एक युवक गंभीर जखमी

कारला दुचाकी धडकल्याच्या कारणारुन झालेल्या मारहाणीत एक युवक गंभीर जखमी

 कारला दुचाकी धडकल्याच्या कारणारुन झालेल्या मारहाणीत एक युवक गंभीर जखमी

पिंपरी, ता. २२ - इनोव्हा कारला दुचाकी धडकल्याच्या कारणारुन झालेल्या मारहाणीत एक युवक गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (ता. २१) पूर्णानगर चिखली येथे घडली. मारहाण करणाऱ्या तीन आरोपींपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे, दोन अल्पवयीन गुन्हेगार आहेत.  

याबाबत, सिध्दांत गणेश यादव (वय २२ वर्ष, व्यवसाय, रा. कुदळवाडी, चिखली) याने तक्रार दिली आहे. सौद सामानी अब्दुल मतीन (वय २० वर्ष,  रा. मोरवाडी गावठाण, पिंपरी) हा अटकेत आहे. फिर्यादी सिद्धांत याच्या इनोवा क्रिस्टा कारला  मोटरा सायकलने धडक दिली. मोटारसायकल चालक ओंकार संतोष वाघमारे व त्याचे दोन मित्र आरमान उल्लाउद्दीन खान व सौद सामानी अब्दुल मतीन यांनी धमकी देवुन शिवीगाळ करुन हातांनी, हातातील धातुच्या कडयाने, दगडाने व काचेच्या ग्लासने केलेल्या मारहाणीमध्ये ऋषीकेश अशोक वहीले हा युवक गंभीर जखमी झाला आणि ध्रुव संदिप सोनी हा किरकोळ जखमी झाला आहे. फिर्यादी सिद्धांतच्या चारचाकीचे नुकसान केले. 

मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (२),११५ (२), ३५२,३५१ (२),३ (५),३२४ (४) आणि भारतीय दंड विधान कलम ३२६,३२१,५०६,५०४,३४,४२७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories