मोरेवस्ती-चिखलीमधील अष्टविनायक हाऊसिंग सोसायटीत लागली आग, तीन दुचाकी जळाल्या

मोरेवस्ती-चिखलीमधील अष्टविनायक हाऊसिंग सोसायटीत लागली आग, तीन दुचाकी जळाल्या

मोरेवस्ती-चिखलीमधील अष्टविनायक हाऊसिंग सोसायटीत लागली आग, तीन दुचाकी जळाल्या 

पिंपरी, ता. १६ - पिंपरी-चिंचवड शहरातील मोरेवस्ती, चिखली परिसरातील अष्टविनायक हाऊसिंग सोसायटी परिसरात मंगळवारी (ता. १६) पहाटे 3 च्या सुमारास आग लागली.  A-28 इमारतीजवळ उभ्या असलेल्या तीन दुचाकी पूर्णपणे जळाल्या आहेत. 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग लागल्यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.  या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांमुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

अग्निशमन विभाग व पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू असून नुकसानाचा पंचनामा करण्यात येत आहे.  सोसायट्यांच्या परिसरात अग्निसुरक्षा अधिक प्रभावी करावी, अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories