डेंगळे पुलाखाली अडकलेल्या युवकाची अग्निशमन दलाकडून यशस्वीरित्या सुटका

डेंगळे पुलाखाली अडकलेल्या युवकाची अग्निशमन दलाकडून यशस्वीरित्या सुटका

डेंगळे पुलाखाली अडकलेल्या युवकाची अग्निशमन दलाकडून यशस्वीरित्या सुटका

पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ -  पुण्यात डेंगळे पुलाखाली पाण्याच्या प्रवाहात चेंबरवर अडकलेल्या युवकाची शुक्रवारी (ता. ३१) पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता, धाडस आणि कौशल्याच्या बळावर सुखरूप सुटका केली.

वाढत्या पाण्याच्या प्रवाहात कोणताही विलंब न करता दोरखंड, शिडी व लाईफ जॅकेटच्या साहाय्याने अवघ्या १५ ते २० मिनिटांत युवकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

या बचाव मोहिमेत वाहन चालक समीर शेख तसेच जवान समित दळवी, गणेश लोणारे, राजेंद्र महाडीक, प्रसाद नाणेकर, संतोष अरगडे, प्रतीक कुंभार आणि आतिश नाईकनवरे यांनी धाडसी व तत्पर कामगिरी बजावली.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे महानगरपालिका अग्निशमन दल सदैव सज्ज आहे, असा विश्वास जवानांनी नागरिकांना दिला. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories