पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाण पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात

पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाण पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात

पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाण पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात

पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ - पिंपरी (प्रभाग क्र. २१) येथील मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाण पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.  या कामाची प्रत्यक्ष पाहणी नगरसेवक  संदीप  वाघेरे यांनी नुकतीच केली. 

यावेळी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता विजय भोजने साहेब, उपअभियंता राहुल जन्नू साहेब, सचिन ठक्कर साहेब, बाळा डंबरे,  संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पुलाच्या उर्वरित कामांचा आढावा घेऊन काम अधिक वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत वाघेरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. 

पुढील सुमारे तीन महिन्यांत पुलाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर हा महत्त्वाचा रेल्वे उड्डाण पूल नागरिकांच्या सेवेसाठी वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे.

हा पूल सुरू झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल, प्रवास अधिक सुरक्षित व जलद होईल आणि हजारो नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळेल, असे वाघेरे यांनी सांगितले. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories