घरकुल स्पाईन रोड चौकात व्हॉल्वमधून पाच दिवसांपासून पाण्याची गळती, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

घरकुल स्पाईन रोड चौकात व्हॉल्वमधून पाच दिवसांपासून पाण्याची गळती, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

घरकुल स्पाईन रोड चौकात व्हॉल्वमधून पाच दिवसांपासून पाण्याची गळती, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

महापालिकेने त्वरित व्हॉल्व्हची दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवावी - सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव 

पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात १५ टक्के पाणी कपात केली आहे, नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, घरकुल स्पाईन रोड चौकातील मुख्य पाणीपुरवठा वाहिनीच्या व्हॉल्वमधून गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे, आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. महापालिकेने त्वरित व्हॉल्व्हची दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवावी, अशी तातडीची सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी केली आहे.

मारुती जाधव यांनी व्हॉल्व्हमधून होणाऱ्या पाणी गळतीची परिस्थिती महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

सदर ठिकाणी पाणी सातत्याने वाहत असून परिसरात चिखल व पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, घरकुल स्पाईन रोड हा वर्दळीचा मार्ग असून अनेक महापालिका कर्मचारी व अधिकारी दररोज याच रस्त्यावरून ये-जा करतात. तरीही पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या गळतीकडे कोणत्याही संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे.

''एका बाजूला नागरिकांवर पाणी कपात लादली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. पाच दिवसांपासून सुरू असलेली ही गळती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिसत नाही का? की जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे?'', असा संतप्त प्रश्न मारुती जाधव यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांवर पाणी कपात लादायची आणि प्रशासनाकडून पाण्याची नासाडी केली जातेय, हे चालणार नाही, असे जाधव यांनी म्हटले आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories