news
clock
प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून संपावर, ससून रुग्णालयातील परिचारीकाही संपात सहभागी

प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून संपावर, ससून रुग्णालयातील परिचारीकाही संपात सहभागी

प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून संपावर, ससून रुग्णालयातील परिचारीकाही संपात सहभागी 

पुणे, ता. २० -  सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, रिक्त जागांची भरती, शिक्षकांना जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करणे या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून (ता. २१) बेमुदत संपावर जाणार आहेत. 'राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन (संलग्न फेडरेशन) देखील सहभागी होणार आहेत. ससून रुग्णालयातील परिचारीका संपावर जाणार असल्याने रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

याबाबत,  राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, शासनाने विविध प्रलंबित मागण्यांबाबत आश्वासने दिली होती मात्र त्याचा सरकारला विसर पडला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी, शिक्षकांनी गेल्या वर्षभरात सात वेळा आंदोलने केली. परंतु, सरकारने आंदोलनांची कोणतीही दखल घेतली नाही. 

राज्य सरकारच्या वतीने सन २०२४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतनासंदर्भात नियम आणि कार्यपध्दती तसेच अटी व शर्ती विषद करणारी अधिसूचना दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप काढण्यात आलेली नाही. त्यामुळे १ मार्च २०२४ पासून आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तीवेतन अद्यापही मिळालेले नाही.  सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १०, २० व ३० वर्षानंतरच्या लाभापासून हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वंचित राहिले आहेत.

 रिक्त पदे भरण्याचा वेग अतिमंद आहे. सध्या मंजूर पदांच्या ३५ टक्के पदे रिक्त आहेत. चतुर्थश्रेणी आणि वाहनचालकांच्या पदभरतीस १०० टक्के बंदी लादण्यात आली आहे.

''सरकार या प्रलंबित मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे  राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संप पुकारला आहे. '' असे महाराष्ट्र कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितले. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने परिचारिका संपावर जाणार असल्याचे पत्र रु (संलग्न फेडरेशन) पुणे विभागाच्या अध्यक्षा प्रज्ञा गायकवाड यांनीही परिचारिकांच्या मागण्यांवर शासनाने त्वरीत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा २१ एप्रिलपासून राज्यभर बेमुदत संप सुरु केला जाईल, असा इशारा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाला दिले आहे.  



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories