पुणे शहर / जिल्हा
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी हडपसरवासियांचा पुणे महापालिकेवर हंडा मोर्चा
Mar 12 2026
60
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी हडपसरवासियांचा पुणे महापालिकेवर हंडा मोर्चा
पुणे, ता. १२ - हडपसर परिसरात (प्रभाग क्रमांक ४१) कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. त्यामुळे, नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेने बुधवारी (ता. ११) महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेचा निषेध नोंदविला. आंदोलकांच्या वतीने शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती टकले, माजी सरपंच राकेश झांबरे, मच्छिंद्र दगडे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, सुभाष घुले, मिलिंद अहिरे आदी उपस्थित होते. या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.