news
clock
तापमान वाढत आहे… काळजी घ्या.... महापालिकेची नागरिकांना सूचना

तापमान वाढत आहे… काळजी घ्या.... महापालिकेची नागरिकांना सूचना

तापमान वाढत आहे… काळजी घ्या.... महापालिकेची नागरिकांना सूचना 

पिंपरी, ता. २७ - शहरातील तापमान वाढत आहे. त्यामुळे ‘उष्माघाताचा’ धोका वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, बाहेर जाताना पुरेसे पाणी सोबत ठेवावे, डोक्याला रुमाल बांधावा, टोपी घालावी, अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत. 

उष्माघाताच्या घटनांची शक्यता लक्षात घेऊन महाालिकेची सर्व रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या, अतिशय थकवा आणि शरीराचे तापमान वाढणे, अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories