हॉटेल कर्मचारी व ग्राहकातील वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणांना मारहाण

हॉटेल कर्मचारी व ग्राहकातील वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणांना मारहाण

हॉटेल कर्मचारी व ग्राहकातील वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणांना मारहाण 

पिंपरी, ता. २७ - हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरुन ग्राहकाशी झालेल्या वादात हॉटेलमालकाने व त्याच्या सहकाऱ्यांनी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाला व त्याच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि हातातीलकडे एकाच्या तोंडावर मारुन त्याला जखमी केले. ही घटना पिंपळे गुरव येथील हॉटेल थ्री इडीयट्सच्या पार्किंगमध्ये रविवारी (ता. २६) रात्री दीडच्या सुमारास घडली. आरोपींविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी, मारहाण झालेले  सूरज शंकर झांजुर्णे (वय ३२ वर्षे, रा. इंद्रायणीनगर-भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी विकास अनिलकुमार सेवाणी (वय २५ वर्षे, रा.  पिंपरी), अशिष सुनिल भेगडे (वय २९ वर्षे, रा. तळेगाव दाभाडे), प्रेम दिलबहादुर थापा (वय २१ वर्षे) व  अनिलकुमार अर्जनदास मेवाणी (वय ५२ वर्षे, रा. पिंपरी)  यांना बीएनएस कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस दिली आहे

आरोपी हॉटेल मालक विकास अनिलकुमार सेवाणी व त्याच्या कर्मचाऱ्यांनी  बिल देण्याचे कारणावरुन हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकासोबत वाद करत होते. ते सोडविण्यासाठी फिर्यादी सूरज व फिर्यादीचे मित्र आशुतोष घोरपडे व प्रणव झावरे हे गेले. त्यांना चारही आरोपींनी ''तुम्ही आमचे मध्ये का येता''असे म्हणुन त्या कारणावरुन शिवीगाळ करुन हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी सेवाणी याने त्याच्या हातात असणा-या कड्याने फिर्यादीचे तोंडावर, ओठावर, नाकावर मारुन जखमी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. 

आरोपींवर सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम  ११८ (१), ११५ (२), ३५२,३५१ (२), ३ (५). प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories