केंद्रीय आयुध भंडार-देहूरोड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

केंद्रीय आयुध भंडार-देहूरोड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

केंद्रीय आयुध भंडार-देहूरोड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पिंपरी, ता. २० - आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून  केंद्रीय आयुध भंडार (सी.ओ.डी.), देहूरोड येथे आज भव्य योग शिबिर आणि मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. सर्व कर्मचाऱ्यांनी योगासने करुन यापुढेही योगसाधना करण्याचा संकल्प केला. 

 उपस्थित लष्करी अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना प्रसिद्ध योग गुरु  दत्तात्रेय भसे  यांच्यासह योग शिक्षिका शुभांगी गाडे, सुषमा पवार,  प्रकाश बहाकर, बाबूराव थोरबले आणि लक्ष्मण टिळेकर यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिकांसह उत्तम मार्गदर्शन केले. दैनिक जीवनात योगाचे महत्त्व आणि आरोग्यासाठी त्याची असणारी गरज यावर यावेळी तज्ज्ञांनी प्रकाश टाकला.

या कार्यक्रमात मेजर रतनलाल पाटीदार यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटीदार यांच्या हस्ते  योगगुरु दत्तात्रेय भसे साहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित इतर सर्व योग शिक्षकांचा सत्कार सी.ओ.डी. वर्क्स कमिटीच्या सन्माननीय सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.

 डेपोचे कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर, डेप्युटी कमांडंट कर्नल अखिलेश कुमार आणि मेजर वसंत रंजन यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. 

सी.ओ.डी. वर्क्स कमिटीचे व्हाईस चेअरमन उमाकांत नारायण लिलाकर, कमिटी सदस्य निलेश भेगडे,  विक्रम टकले, विकास बालघरे, आकाश पिल्ले, शबीर इनामदार आणि राहुल असबे यांनी केले. वर्क्स कमिटीचे सेक्रेटरी संजय जगदीश डुमडे यांनी सूत्रसंचालन केले.  









Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories