सोमाटणे फाटा येथे अल्पवयीन गुन्हेगाराकडून जिवंत काडतूसासह पिस्तूल जप्त

सोमाटणे फाटा येथे अल्पवयीन गुन्हेगाराकडून जिवंत काडतूसासह पिस्तूल जप्त

 सोमाटणे फाटा येथे अल्पवयीन गुन्हेगाराकडून जिवंत काडतूसासह पिस्तूल जप्त 

पिंपरी, ता. २७ - मावळ तालुक्यात सोमाटणे फाटा येथे रविवारी (ता. २६)  ४१ हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस अल्पवयीन गुन्हेगाराकडून पोलिसांनी जप्त केले आहे. 

याबाबत, पोलिस शिपाई सुहास कबिर झेंडे यांनी तक्रार दिली आहे. या अल्पवयीन गुन्हेगाराने ४१,०००/-रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस बेकायदा बिनापरवाना बाळगले होते. सोमाटणे फाटा येथील नॅशनल हेवी इंजिनिअरींग को-ऑफ कंपनीसमोरील मोकळ्या जागेत तो पिस्तूलासह पोलिसांना सापडला. 

या अल्पवयीन गुन्हेगारावर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महा पो का. क. ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories