काळेवाडीत जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर कारवाई!

काळेवाडीत जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर कारवाई!

काळेवाडी | १ ऑक्टोबर २०२६ : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैशांवर तीन पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई केली. काळेवाडीतील काका होम्स शेजारील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र मारुती तळपे  (पोलीस नाईक ,गुन्हे शाखा युनिट-२, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी लोकेश धम्मरसिंग नेपाळी (वय ५१, रा. १६ नंबर बसस्टॉप, थेरगाव, पुणे), विरेंद्र बहादूर सौद (वय ३१, रा. डुकरखिंड, पौड रोड, कोथरूड, पुणे), बलबहादूर धानागडे जयगडी (वय ४३, रा. भामा हॉस्पिटलजवळ, मॉडर्न कॉलनी, शिवाजीनगर, पुणे), करण तुलाराम थापा (वय ४३, रा. काका होम्सजवळ, तापकीरनगर, काळेवाडी, पुणे) आणि दीपक बिरोश परियार (वय २८, रा. तापकीरनगर, काळेवाडी, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ३० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास काका होम्स शेजारील मोकळ्या जागेत, रहाटणी परिसरात करण्यात आली.

फिर्यादीनुसार, पाचही जण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ३१ हजार रुपये रोख रक्कम आणि जुगाराच्या साहित्याच्या सहाय्याने तीन पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आले.

याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories