शेअर मार्केटच्या आमिषाने काळेवाडीत 1.84 कोटींची फसवणूक

शेअर मार्केटच्या आमिषाने काळेवाडीत 1.84 कोटींची फसवणूक

काळेवाडी | २९ सप्टेंबर २०२६ : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ४३ वर्षीय व्यक्तीची १ कोटी ८४ लाख ४१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी एक पुरुष आणि एका महिलेसह त्यांच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गोपीचंद बंदपट्टे (वय ४३, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात दिनेश अनिलकुमार शेंडे (वय ४०, रा. रहाटणी, पुणे) आणि एका ३३ वर्षीय महिलेसह त्यांच्या मित्रांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून रोख तसेच ऑनलाइन स्वरूपात एकूण १ कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये स्वीकारण्यात आले.

मात्र, मूळ गुंतवणुकीची रक्कम आणि त्यावरील ठरलेला परतावा परत न करता विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हा प्रकार १ जून २०२० पासून आतापर्यंत काळेवाडीतील नढेनगर येथील राघमा असोसिएटमधील फिर्यादीच्या निवासस्थानी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे पोलिसांच्या नोंदीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून काळेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories