केतनचा खून खटला जलदगतीने चालविण्यात यावा, अग्रवाल कुटुंबियांची मागणी
पुणे, ता. २४ - युवा उद्योजक केतन अग्रवाल याच्या खून प्रकरणाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा, अशी मागणी अग्रवाल कुटुंबीयांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
पुण्यातील उद्योजक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा त्याच्या होणाऱ्या पत्नीने खून केल्याचे उघड झाले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल व तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. केतनच्या वडीलांनी पुणे ग्रामीण पोलिसांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.
ते म्हणाले, ''आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. केतन आणि सियाचा विवाह मध्यस्थीने निश्चित करण्यात आला होता. मध्यस्थी करणाऱ्या कुटुंबीयांचा आमचा परिचय आहे. मात्र, अशा प्रकारचा दगाफटका होईल, असे आम्हाला वाटले नव्हते. आम्ही एकुलता एक मुलगा गमावला. आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. पोलिसांनी सक्षमपणे न्यायालयात बाजू मांडावी. खून खटला जलदगतीने चालविण्यात यावा. ''
- खून खटला, Murder Trial, जलदगती न्यायालय, Fast Track Court, जलदगतीने खटला चालवा, Speedy Trial Demand, आरोपींना कठोर शिक्षा, Strict Punishment Demand
- सिया गोयल, Siya Goyal, चेतन चौधरी, Chetan Chaudhary, प्रेमसंबंधातून खून, Murder Over Relationship, होणाऱ्या पत्नीने खून, Fiancée Murder Case, पुणे ग्रामीण पोलीस, Pune Rural Police
- विशाल अग्रवाल, Vishal Agrawal, अग्रवाल कुटुंब, Agrawal Family, सिया गोयल, Siya Goyal, चेतन चौधरी, Chetan Chaudhary
- केतन अग्रवाल खून प्रकरण, Ketan Agrawal Murder Case, युवा उद्योजक, Young Entrepreneur