पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अतिशय कमी पाणीसाठा शिल्लक
पुणे, ता. २२ - खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील एकूण पाणीसाठा केवळ साडे सात टीएमसी एवढाच शिल्लक राहिला आहे. पानशेत धरणातील पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला आहे. खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार प्रमुख धरणांमध्ये मिळून केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पाटबंधारे विभागाकडून खडकवासला कालव्यातून दौंड, इंदापूर आणि बारामती भागातील शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर ३० मे नंतर निर्बंध घातले जाणार आहेत.
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन, पुणे महानगरपालिका प्रशासन व पाटबंधारे विभागाने केले आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा खालीलप्रमाणे
खडकवासला धरण - ५८ टक्के
पानशेत धरण - ३१ टक्के
टेमघर धरण - ० टक्के
वरसगाव धरण - २३ टक्के