तळवडेत तरुणावर बिअरच्या बाटलीने हल्ला

तळवडेत तरुणावर बिअरच्या बाटलीने हल्ला

तळवडे | ४ ऑक्टोबर २०२६ : ‘तुमची दुचाकी कुठे आहे?’ अशी विचारणा केल्यानंतर २३ वर्षीय तरुणाला बिअरच्या रिकाम्या काचेच्या बाटलीने मारहाण केल्याची घटना तळवडे येथे घडली. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला आणि कानाजवळ गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑक्टोबर रोजी रात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास माळावर मोकळ्या मैदानात, मोठ्या ज्ञानदीप शाळेजवळ, कंटेनमेंट एरिया, तळवडे येथे घडली. यासिन इद्रिस शेख (वय २३,  रा. श्रमिक हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी सोन्या वानखेडे (वय अंदाजे २१, रा. रुपीनगर, तळवडे) आणि ओमकार चव्हाण (वय २१, रा. रुपीनगर, तळवडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी फिर्यादीला “तुमची दुचाकी कुठे आहे?” अशी विचारणा केली. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर आणि उजव्या कानावर बिअरच्या रिकाम्या काचेच्या बाटलीने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याच्या वरील बाजूस चार आणि उजव्या कानाजवळ तीन असे एकूण सात टाके पडले.

तसेच काचेच्या बाटलीने फिर्यादीच्या मानेला, चेहऱ्यावर आणि उजव्या हातावर खरचटल्याच्या जखमा झाल्याचे नमूद आहे. आरोपींनी शिवीगाळ करून या भांडणाबाबत कोणाला सांगितल्यास पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि गोरे करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories