news
clock

ग्राहकांना हुक्का पिण्याची सोय करुन दिल्याप्रकरणी हॉटेल व्यवसायिकावर गुन्हा 

पिंपरी, ता. १४ -  ग्राहकांना खाण्याबरोबर हुक्का पिण्यास जागा देऊन हुक्का पिण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पुरवून इतर ग्राहकांना धोका निर्माण केल्याची घटना भूगाव रस्त्यावरील कोकोरीको हॉटेलमध्ये शुक्रवारी (ता. १३) घडली आहे. या प्रकरणी संबंधित हॉटेल व्यवसायिक व तिथल्या वेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बावधन पोलीस ठाण्याचे पोलिस शिपाई विशाल प्रल्हाद शिंदे यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे. हॉटेल व्यवसायिक अमित अरुण अमराळे (वय-४५ वर्षे,  रा. ता. मुळशी) आणि हॉटेलमधील पंकज भुवन जोशी (वय-३५ वर्षे, धंदा वेटर, रा. भूगाव) हे या घटनेतील आरोपी असून त्यांच्याविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपींनी हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना खाद्य पदार्थांसोबत हुक्का पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली.  १,०००/- रुपये किंमतीचे एकूण ५ हुक्का पॉट व ५ हुक्का पाईप, १,५००/- रुपये किंमतीचा एक हुक्क्याचा डबा (फ्लेवर) आणि हुक्का पिण्यासाठी लागणारे इतर साहित्य पुरवले. यामुळे तेथे उपस्थित असणाऱ्यांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता होती. 

अशा धोकादायक रितीने तंबाखुजन्य व ज्वालाग्राही पदार्थाचा हुक्का पॉट व हुक्का फ्लेवर बाळगल्यामुळे आरोपींविरोधात  सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने आधिनियम चे कलम ४, २१ व भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २८१, २८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



 हॉटेल, कोकोरीको, पिंपरी, हुक्का, हुक्का पॉट, हुक्का पाईप, हुक्का फ्लेवर, तंबाखू, धोकादायक पदार्थ, ग्राहक, खाद्य पदार्थ, बावधन पोलीस ठाणे, गुन्हा, आरोपी, अमित अरुण अमराळे, पंकज भुवन जोशी, सिगारेट, तंबाखुजन्य उत्पादने, Indian Penal Code 2023, Sections 223, 281, 287, Cigarette and Other Tobacco Products Act, Sections 4, 21, restaurant, waiter, provision of hookah, Pune, safety risk


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories