म्हाळुंगेत खासगी जागेत अतिक्रमण करून तोडफोड; ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा

म्हाळुंगेत खासगी जागेत अतिक्रमण करून तोडफोड; ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा

मुळशी | ३० सप्टेंबर २०२६ : बांधकाम व्यावसायिकाच्या जागेत बेकायदेशीर जमावाने अतिक्रमण करून जागेतील बोर्ड तोडत नुकसान केल्याची घटना म्हाळुंगे गावात घडली. तसेच सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि संपूर्ण निगराणी व्यवस्थेचे इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बावधन पोलिसांनी दोन नामनिर्देशित व्यक्तींसह अन्य ४० ते ५० अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभि विजय रौंदळ (वय ३३, रा. बाणेर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अरुण वेणुनाथ खराडे पाटील, प्रसाद अरुण खर्डे पाटील आणि अन्य ४० ते ५० अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीच्या म्हाळुंगे गाव, सर्व्हे नं. ९/१० येथील जागेत अतिक्रमण केले. जागेतील बोर्ड तोडून नुकसान करण्यात आले. तसेच जागेच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि संपूर्ण निगराणी व्यवस्था जाणूनबुजून नष्ट करून गुन्ह्याचे इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

ही घटना २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories