वाकडमध्ये कारची स्कूटरला धडक; दोन जण जखमी

वाकडमध्ये कारची स्कूटरला धडक; दोन जण जखमी

वाकड | ३० सप्टेंबर २०२६ : वाकड चौकातून भुजबळ चौकाच्या दिशेने स्कूटरवरून जात असलेल्या २१ वर्षीय तरुणाच्या स्कूटरला कारने अचानक वळण घेत धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात तरुणाच्या डाव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असून स्कूटरचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अज्ञात महिला कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसिंग पवनसिंग शेखावत (वय २१, रा.  चिंचवड लिंक रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

ही घटना २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास वाकड चौक ते भुजबळ चौक मार्गावर साई श्री विटा लाईफ हॉस्पिटल, भुजबळ चौक, वाकड येथे घडली.

फिर्यादी आणि त्यांचा मित्र श्रवण हे एमएच १४ एमआर ००१६ क्रमांकाच्या स्कूटरवरून वाकड चौकातून भुजबळ चौकाच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्या बाजूने एमएच १४ एमएच १५४१ क्रमांकाची लाल रंगाची मारुती सुझुकी कार जात होती.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, अज्ञात महिला कारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने कार चालवत अचानक उजव्या बाजूला वळण घेतले. त्यामुळे कारची फिर्यादीच्या स्कूटरला धडक बसली. धडकेनंतर फिर्यादी स्कूटरसह रस्त्यावर पडले. त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला मार लागून दुखापत झाली, तसेच स्कूटरचेही नुकसान झाले.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories